मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्या आंदोलनासाठी खारघर इथं पर्यायी जागा देण्याबद्दल सरकारने विचार करावा, असं मुंबई उच्च न्यायालयानं आज सुचवलं. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, मुंबईच्या दैनंदिन जगण्यात अडथळा येणार नाही, यादृष्टीनं या पर्यायाचा विचार करावा, अशी न्यायाधीश न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या पीठानं सूचना केली.
मतभेद हा लोकशाहीचा अविभाज्य भाग असला, तरी आंदोलनं ठरवून दिलेल्या ठिकाणीच व्हावी, असंही न्यायालयानं नमूद केलं. दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी २७ ऑगस्टचा मोर्चा पुढ ढकलावा, अशी विनंती भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली होती.