डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

आरक्षणाच्या मागणीसाठीचं मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण स्थगित, ओबीसी उपोषणकर्त्यांचंही उपोषण मागे

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं गेल्या नऊ दिवसांपासून उपोषण करत असलेले मनोज जरांगे यांनी काल उपोषण स्थगित केलं. आता उपोषण करून नाही तर सत्तेत बसून आरक्षण मिळवू, असं जरांगे यांनी यावेळी म्हटल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
दरम्यान, मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हिंगोली जिल्ह्यात डोंगरगाव पूल इथं नागरिकांनी काल कयाधू नदीपात्रात उतरून आंदोलन केलं.
दरम्यान, ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं देखील आमरण उपोषण काल स्थगित झालं. जालना इथल्या खासगी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.