मनोज जरांगे यांचा २९ सप्टेंबरपासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा निर्धार

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी २९ सप्टेंबरपासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा निर्धार आज आंतरवाली सराटी इथं जाहीर केला. गेल्या वर्षी २९ ऑगस्ट याच दिवशी जालना जिल्ह्यातल्या आंतरवाली सराटीमधून त्यांनी आंदोलन सुरू केलं होतं.

 

या आंदोलनाच्या वर्षपूर्तीनिमित्त त्यांनी आज आंदोलक समन्वयकांची आंतरवाली इथं बैठक बोलावली होती. त्यावेळी मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत हे उपोषण सुरूच राहील असं ते म्हणाले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही जरांगे यांनी टीका केली.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.