मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मोर्चा २७ ऑगस्टला मुंबईकडे निघणार आहे. हा मोर्चा जालना जिल्ह्यातल्या आंतरवाली सराटी इथून निघून शहागड, तुळजापूर, पैठण, शेवगावमार्गे पुढे जाणार आहे.
त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काही मार्गांवरच्या वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर, बिडकीन, पैठणमार्गे शेवगावकडे जाणारा आणि येणारा मार्ग, तसं शहागड, नवगावमार्गे पैठणकडे जाणारा आणि येणारा मार्ग २८ तारखेला संध्याकाळपर्यंत बंद राहणार असून, नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन वाहतूक पोलिसांनी केलं आहे.