प्रधानमंत्री नरेंद्र मोदी २९ डिसेंबरला आकाशवाणीवरील ‘मन की बात’ कार्यक्रमामध्ये नागरिकांशी संवाद साधणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी २९ डिसेंबर रोजी आकाशवाणीवरील ‘मन की बात’ कार्यक्रमामध्ये देशातील आणि परदेशातील लोकांशी संवाद साधणार आहेत. हा या मासिक रेडिओ कार्यक्रमाचा ११७ वा भाग असेल.

 

या कार्यक्रमासाठी नागरिक आपले विचार आणि सूचना टोल फ्री क्रमांक 1800-11-7800 वरून पाठवू शकतात. तसेच, नरेंद्र मोदी अ‍ॅप किंवा MyGovओपन फोरमद्वारे ऑनलाइनही आपले मत सामायिक करू शकतात. येत्या भागासाठीच्या सूचना या महिन्याच्या २७ तारखेपर्यंत स्वीकारल्या जातील.