August 26, 2024 8:56 PM

printer

मणीपूरमध्ये पेट्रोल पंपांवर सुरक्षा दलांच्या जवानांची नियुक्ती करायचा निर्णय

मणीपूरमध्ये पेट्रोल पंपांवर  सुरक्षा दलांच्या जवानांची नियुक्ती करायचा निर्णय मणीपूर राज्य सरकारने घेतला आहे. आज इंफाळमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत मणीपूरचे ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण व्यवस्था मंत्र्यांनी ही माहिती दिली. सध्याच्या परिस्थितीचा फायदा उचलत काही समाजकंटक पेट्रोलपंपावरुन सक्तीने इंधन घेऊन त्याचे दाम चुकते करत नाहीत अशा तक्रारी पेट्रोल व्यावसायिकांकडून आल्यामुळे हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं.