मणिपूरमध्ये 203 बेकायदेशी शस्त्रे आणि दारूगोळा जप्त

मणिपूर पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत  २०३ बेकायदेशीर शस्त्रं, दारूगोळा, स्फोटकं आणि युद्धसामग्री जप्त केल्याची माहिती मणिपूर पोलीस महासंचालक कार्यालयानं दिली आहे. यासंदर्भात मिळालेल्या पक्क्या माहितीच्या आधारे तेनग्नौपाल, कांगपोकपी, चंदेल आणि चुराचंदपूर या मणिपूरच्या काही जिल्ह्यांमध्ये काल मध्यरात्रीपासून ते आज सकाळपर्यंत व्यापक शोध मोहिम राबवली गेली. या मोहीमेत मणिपूर पोलीस, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, लष्कर आणि आसाम रायफल्सचं पथक सहभागी झालं होतं.  

 

मणिपूरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर आणण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून सर्व सुरक्षा यंत्रणा परस्पर समन्वयानं वेळोवेळी अशा कारवाया करत असल्याची माहितीही पोलीस महासंचाक कार्यालयानं दिली आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.