मणिपूर आकस्मिक निधीसाठी ५०० कोटी रुपये राखीव- अर्थमंत्री

मणिपूरमधली परिस्थिती सामान्य होऊन राज्याची भरभराट व्हावी, यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याची ग्वाही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज दिली. त्या राज्यसभेत विनियोजन विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देत होत्या.

 

  मणिपूर राज्यासाठीच्या विनियोजन विधेयकाचाही यात समावेश होता. मणिपूरसाठी आकस्मिक निधी नसल्यानं यासाठी ५०० कोटी रुपये राखून ठेवल्याचं त्यांनी  सांगितलं.  हिंसाचारामुळे राज्यातल्या आर्थिक व्यवहारांवर गंभीर परिणाम झाले असले तरी लवकरच परिस्थितीत सुधारणा होईल, असा विश्वास त्यांनी  व्यक्त केला.

 

अर्थमंत्र्यांच्या उत्तरानंतर सभागृहानं चारही विनियोजन विधेयकांना मंजुरी दिली. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.