December 19, 2025 8:02 PM | Manikrao Kokate

printer

माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती द्यायला न्यायालयाचा नकार

सदनिका घोटाळ्याप्रकरणी राज्याचे माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती द्यायला मुंबई उच्च न्यायालयानं आज नकार दिला. न्यायालयानं शिक्षेला स्थगिती दिली नसल्यानं त्यांची आमदारकी जाईल, अशी माहिती या प्रकरणातल्या वकील श्रद्धा ढुबे-पाटील यांनी वार्ताहरांशी बोलताना दिली. मात्र वैद्यकीय कारणास्तव कोकाटे यांची अटक न्यायालयानं पुढे ढकलली आहे. त्यांना १ लाख रुपयाच्या जातमुचलक्यावर उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला. दरम्यान, कोकाटे यांची आज अँजिओग्राफी झाली. त्यांना ४ ब्लॉकेज असून त्यांच्यावर बायपास सर्जरी करणं गरजेची आहे. बायपास करायची नसेल तर अँजिओप्लास्टी करावी लागेल, अशी माहिती लीलावती रुग्णालयानं दिली.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.