सदनिका घोटाळ्याप्रकरणी क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयातही दोषी

मुख्यमंत्री स्वेच्छाधिकार योजनेच्या दहा टक्के राखीव कोट्यातून मिळवलेल्या चार सदनिकांच्या घोटाळ्याप्रकरणी क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे, आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना आज नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयानं दोषी ठरवलं. 

 

सवलतीच्या दरात घरं मिळवण्यासाठी कोकाटे यांनी खोटी कागदपत्रं सादर केली, तसंच आपल्या नावावर घर नसल्याचं प्रतिज्ञापत्र दिल्याचा आरोप त्यांच्यावर होता. याप्रकरणी याआधी २० फेब्रुवारीला नाशिकच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी कोकाटे बंधूंना दोषी ठरवत दोन वर्षांचा सश्रम कारावास आणि ५० हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली होती. त्याविरुद्ध कोकाटे यांनी जिल्हा आणि सत्र न्यायालयात दाद मागितली होती. आज जिल्हा व सत्र न्यायाधीश पी.एम.बदर यांच्या न्यायालयात या खटल्याची अंतीम सुनावणी झाली. त्यांनी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिलेला निकाल कायम ठेवत, दोन वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली. 

 

राज्य सरकारनं माणिकराव कोकाटे यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सुनिल केदार यांना शिक्षा होताच २४ तासात त्यांची खासदारकी, आमदारकी रद्द केली होती, पण माणिकराव कोकाटे यांना मात्र सरकार वाचवत आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.