डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

March 19, 2025 7:34 PM | manik rao kokate

printer

बाधित शेतकऱ्यांना ३१ मार्चपर्यंत नुकसान भरपाई देणार- कृषिमंत्री

नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना ३१ मार्चपर्यंत नुकसान भरपाई देणार, असं कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज विधानसभेत एका लक्षवेधीला उत्तर देताना सांगितलं. राजेश विटेकरांनी लक्षवेधी उपस्थित केली होती. या चर्चेत राहुल पाटील आणि सई डहाके यांनीही सहभाग घेतला. नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस आणि पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई त्यांना तातडीनं देण्यासाठी आवश्यक निधीची तरतूद १०० दिवसांच्या कृती आराखड्यात केली आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

 

नागपूरमधे सोमवारी झालेल्या हिंसाचारादरम्यान, महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग करण्याचा प्रयत्न जमावातल्या काही लोकांकडून झाला. या घटनेची तातडीनं चौकशी करण्याचे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पोलीस महासंचालकांना दिले आहेत. अशा घटना रोखण्यासाठी भविष्यात विशेष नियोजन करण्याची गरज असून, महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना आखाव्यात आणि त्यांना आवश्यक प्रशिक्षण व साधनसामग्री पुरवावी, असं त्या म्हणाल्या.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा