डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

भाजपनं देशात फूट पाडण्याचं काम केलं असल्याची मल्लिकार्जुन खर्गे यांची टीका

पंडित जवाहरलाल नेहरू आणि बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या नेत्यांनी लोकशाहीच्या रक्षणासाठी आपलं आयुष्य वेचलं. पण, भारतीय जनता पार्टीने मात्र देशात फूट पाडण्याचं काम केलं अशी टीका काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज केली. नागपूरजवळ उमरेड इथे प्रचारसभेत ते बोलत होते. राज्यात आता मतदारांना सरकार बदलायचं आहे आणि हे खोटं सरकार पाडायचं आहे, असं आवाहन त्यांनी उपस्थितांना केलं.

 

त्यानंतर खर्गे यांनी सांगली इथंही प्रचारसभा घेतली. महाराष्ट्रातलं सरकार हे चोरीचं सरकार असल्याची टीका यावेळी खर्गे यांनी केला. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून महायुती सरकारने इतर पक्षातल्या नेत्यांना फोडलं, असा आरोप त्यांनी केला. राज्यात लोककल्याणकारी सरकार आणायचं असेल तर महाविकास आघाडीचे उमेदार निवडून द्या असं आवाहन खर्गे यांनी केलं.