October 8, 2024 7:15 PM

printer

मालदीवचे राष्ट्रपती महम्मद मुईज्जू यांचं सपत्नीक मुंबई विमानतळावर आगमन

भारताच्या दौऱ्यावर असलेले मालदीवचे राष्ट्रपती महम्मद मुईज्जू यांनी आज सपत्नीक मुंबई विमानतळावर आगमन झालं. मुंबई उपनगरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी त्यांचं स्वागत केलं. यावेळी पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.