मालदीवचे परराष्ट्र मंत्री डॉ. अब्दुल्ला खलील आजपासून तीन दिवस भारत दौऱ्यावर

मालदीवचे परराष्ट्र मंत्री डॉ. अब्दुल्ला खलील आजपासून तीन दिवस भारत दौऱ्यावर येणार आहेत. जानेवारी आणि मार्चमध्ये झालेल्या भेटींनंतर परराष्ट्र मंत्री डॉ. खलील यांचा हा या वर्षीचा तिसरा भारत दौरा असेल. या भेटीदरम्यान, ते भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्याशी द्विपक्षीय चर्चा देखील करतील. दोन्ही देशांमधील व्यापक आर्थिक आणि सागरी सुरक्षा भागीदारी मजबूत करणे हा या भेटीचा उद्देश आहे.