मलेशिया खुल्या सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत लक्ष्य सेनचा पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश

क्वालालाम्पूर इथं सुरू असलेल्या मलेशिया खुल्या सुपर ७५० बॅडमिंटन स्पर्धेत सिंगापूरच्या जिया हेंग जेसन तेह याचा पराभव करत भारताच्या लक्ष्य सेनने पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. या सामन्यात लक्ष्य सेनने जिया हेंग जेसन तेह याचा २१-१६, १५-२१, २१-१४ असा पराभव केला. दुसऱ्या फेरीत त्याचा सामना फ्रान्सच्या क्रिस्टो पोपोव किंवा हाँगकाँगच्या ली चेउक यीऊ याच्याशी होईल. 

 

दरम्यान, महिला एकेरी स्पर्धेत भारताच्या मालविका बनसोड हिला थायलंडच्या खेळाडूकडून ११-२१, ११-२१ असा पराभव स्वीकारावा लागला. आज आयुष शेट्टी याचा सामना मलेशियाच्या खेळाडूशी तर पुरुष दुहेरीत एम आर अर्जुन आणि हरीहरण अमसकरूनन यांचा सामना जपानच्या खेळाडूंशी होणार आहे.