मलेशिया आणि इंडोनेशिया या देशांनी ग्रोक या कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चॅट बॉट वर बंदी घातली आहे. एलोन मस्क यांच्या एक्स ए आय कंपनीने तयार केलेल्या या चॅट बॉट चा वापर अश्लील छायाचित्र, चित्रफिती आणि इतर अश्लील आशयनिर्मितीसाठी होत असल्यामुळे हे पाऊल उचलल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. डिजिटल विश्वात कार्यरत नागरिकांच्या सुरक्षितता आणि मानवाधिकारांचं यातून उल्लंघन होत असल्याचं इंडोनेशियाचे डिजिटल व्यवहार मंत्री मेतुया हफीद यांनी म्हटलंय. ग्रोकचा गैरवापर केला जाऊ नये म्हणून अनेक प्रतिबंधात्मक उपायांची योजना केली जाणार आहे, तोपर्यंत ही बंदी कायम राहील असं दोन्ही देशांनी म्हटलं आहे.
Site Admin | January 12, 2026 1:38 PM | AI Grok | Indonesia | Malaysia
मलेशिया आणि इंडोनेशिया या देशांकडून ‘ग्रोक’ या AI आधारित चॅट बॉटवर बंदी