भारतीय औषध संशोधन परिषद आणि राष्ट्रीय प्रतिकारशक्तीशास्त्र संस्थेचे शास्त्रज्ञ संयुक्तपणे मलेरिया प्रतिबंधक लस विकसित करत आहेत. या लशीचे नाव ऍडफॅल्सीवॅक्स असं असून सध्या तिच्या चाचणीदरम्यानचे निकाल आशादायक असून लवकरच ती सार्वत्रिक वापरासाठी उपलब्ध होऊ शकेल. ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत संपूर्ण स्वदेशी संशोधनानं विकसित झालेल्या या लसीमुळे मलेरियाचा प्रसार कमी होईल तसंच मलेरिया निर्मूलनाला हातभार लागेल.
Site Admin | July 20, 2025 3:31 PM | Malaria Vaccine
मलेरिया प्रतिबंधक लस संशोधन प्रगतीपथावर
