January 20, 2026 2:49 PM

printer

इलेक्ट्रॉनिक्स निर्यात क्षेत्रात भारत जगातला तिसरा सर्वात मोठा निर्यातदार देश

भारतानं २०२५ मधे ४७ अब्ज डॉलर्स म्हणजेच चार लाख १५ हजार कोटी रुपयांची विक्रमी इलेक्ट्रॉनिक्स निर्यात साध्य केली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी समाजमाध्यमावरुन ही माहिती दिली. पीएलआय आधारित योजनेतून उत्पादित स्मार्टफोन निर्यातीतून ३० अब्ज डॉलर्सची निर्यात करण्यात आली आहे. आर्थिक वर्ष २०१५ पासून इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या निर्यातीत ११ पट वाढ झाली असून, इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात आता भारत जगातला तिसरा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या उत्पादनामुळे महिलांच्या मजबूत सहभागासह २५ लाख नवीन नोकऱ्या निर्माण झाल्या असून एमएसएमईसाठी मोठ्या संधी आणि तरुणांना दीर्घकालीन कौशल्य उपलब्ध झाल्याचं वैष्णव यांनी सांगितलं.