देशभरात आज मकर संक्रांत, उत्तरायण, लोहडी, माघ बिहू आणि पोंगल हे सण साजरे होते आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्व देशवासियांना यानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. हे सण देशाच्या समृद्ध कृषी परंपरांचे प्रतीक आहेत आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना प्रतिबिंबित करतात, असं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनीही या सणांच्या निमित्ताने सर्वांना आनंद, आरोग्य आणि समृद्धीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. संक्रातींचा सण सर्वांच्या जीवनात आनंद, आरोग्य घेऊन येवो, अशी कामना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व्यक्त केली. तर माघ बिहूच्या निमित्ताने देशात धान्यसमृद्धी आणि एकतेचा आनंद साजरा होवो, अशा शुभेच्छा मोदी यांनी आपल्या समाज माध्यमावर दिल्या आहेत. चैतन्यशील तमिळ संस्कृती आणि निसर्गाशी संबंधित असलेला पोंगल हा उत्सव संतुलनाचा मार्गदर्शक असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले. केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांच्या निवासस्थानी झालेल्या मेळाव्याला ते संबोधित करत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही सर्वांना देशभरातल्या विविध सणांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Site Admin | January 14, 2026 1:20 PM | Bihu | Makar Sankranti | Pongal | uttarayan
देशभरात मकरसंक्रांत, उत्तरायण, लोहडी, माघ बिहू आणि पोंगल सणांचा उत्साह