लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना केवायसी पूर्ण करणं बंधनकारक

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना केवायसी प्रकिया सुलभपणे पुर्ण करण्यासाठी ई-केवायसी सुविधा देण्यात आली आहे. या योजनेतून लाभ मिळालेल्या महिलांनी दोन महिन्याच्या आत केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी असं आवाहन राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केलं आहे. ladakibahin.maharashtra.gov.in या पोर्टलवर ई-केवायसी सुविधा दिली आहे.  योजनेतली पारदर्शकता कायम रहावी आणि पात्र लाभार्थ्यांना नियमित लाभ मिळावा यासाठी ही प्रक्रिया पूर्ण करावी असं तटकरे यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.