डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर इथं मुख्य शासकीय महापूजा

कार्तिकी एकादशी आज साजरी होत आहे. पंढरपूर इथं श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते करण्यात आली. दरवर्षी शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात येते, मात्र यंदा विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने ही महापूजा प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आली. लातूर जिल्ह्यातले सागरबाई आणि बाबुराव सगर या दाम्पत्याला पूजेचा मान मिळाला. यावेळी सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम उपस्थित होते. एकादशीनिमित्त सुमारे दोन लाखावर भाविक पंढरपुरात दाखल झाले आहे.
कार्तिकी एकादशीनिमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथं दर्शनासाठी जाणार्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन एसटी महामंडळाकडून विविध आगारातून पैठणला जादा बस सोडण्यात येत आहेत.
छत्रपती संभाजीनगरनजिक पंढरपूर इथं देखील एकादशीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.