राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते एस. श्रीनिवास यांच्या हत्येतील मुख्य हल्लेखोर अटकेत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते एस. श्रीनिवास यांच्या हत्येतील मुख्य हल्लेखोराला केरळमध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक करण्यात यश मिळवलं आहे. शमनाद इल्लिकल असं या हल्लेखोराचं नाव आहे. बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने ही हत्या घडवून आणली होती. इल्लिकलवरर सात लाख रुपयांचे बक्षीस होते आणि तो गेल्या तीन वर्षांपासून फरार होता.