राज्यभरातल्या महसुलाशी संबंधित सुनावण्या डिजिटल स्वरूपात करण्यासाठीच्या प्रत्यय या प्रणालीचा प्रारंभ आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झाला.
‘प्रत्यय’, अर्थात पेपरलेस रिव्हिजन अँड अपील्स इन अ ट्रान्सपरंट वे या प्रणालीमुळे फेरफार, तक्रारी, अपील, पुनर्विलोकन अर्ज इत्यादी विषय ऑनलाईन पद्धतीनं हाताळता येतील आणि नागरिकांना मुंबई किंवा इतर ठिकाणी प्रत्यक्ष हजर राहण्याची गरज भासणार नाही.
यामुळे नागरिकांची पायपीट, वेळ आणि पैशाचीही बचत होणार आहे.आगामी काळात महसुली विभागाच्या सर्व सेवा ऑनलाइन उपलब्ध होतील, यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली.