माहे ही युद्धनौका उद्या मुंबई इथं नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार आहे. माहे श्रेणीतली ही पहिली पाणबुडीविरोधी उथळ पाण्यातली युद्धनौका कोचीच्या जहाजबांधणी गोदीत तयार झाली असून यात ८० टक्क्यापेक्षा जास्त सामग्री स्वदेशी बनावटीची आहे. मलबार किनारपट्टीवरच्या माहे या ऐतिहासिक गावावरून हिचं नाव ठेवण्यात आलं आहे. या युद्धनौकेचं प्रतीक असलेली उरुमी ही तलवार, कलरिपयट्टू या युद्धकलेचा महत्त्वाचा भाग आहे.
Site Admin | November 23, 2025 8:12 PM | mahe yudhhanauka
माहे युद्धनौका मुंबईत नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार