डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

आगामी विधानसभा निवडणुका महायुतीच जिंकेल- आशीष शेलार

आगामी विधानसभा निवडणुका महायुतीच जिंकेल असा विश्वास भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक आज मुंबईत झाली. त्यानंतर शेलार बोलत होते. यात राज्य सरकारनं सादर केलेल्या अर्थसंकल्पावर अभिनंदन ठराव झाला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व २८८ मतदार संघातल्या प्रचारासाठीचा कार्यक्रम १० जुलैपर्यंत ठरवणार असल्याचं ते म्हणाले. भाजपचे राज्य प्रभारी भूपेंद्र यादव, सहप्रभारी अश्विनी वैष्णव, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसंच इतर नेते बैठकीला उपस्थित होते. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.