September 4, 2024 7:01 PM | ramdas athavale

printer

महायुतीनं रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना सत्तेत सहभाग आणि सन्मान द्यावा – रामदास आठवले

महायुतीनं रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना सत्तेत सहभाग द्यावा आणि सन्मान द्यावा अशी अपेक्षा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज व्यक्त केली. केंद्रीय मंत्रीमंडळात तिसऱ्यांदा सहभागी झाल्याबद्दल रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी मुंबईत त्यांचा सत्कार केला. त्यावेळी ते बोलत होते.

 

रिपब्लिकनच्या कार्यकर्त्यांना ‘महायुती सरकार आपल्या दारी’ आणि ‘लाडकी बहिण’ योजनेच्या कार्यक्रमांमध्ये डावललं जातं, इतर शासकीय कार्यक्रमांनाही निमंत्रित केलं जात नाही, याबद्दल आठवले यांनी नाराजी व्यक्त केली. रिपब्लिकन कार्यकर्त्यांना महामंडळं, जिल्हा नियोजन समिती यासारख्या ठिकाणी नेमणूक देऊन सत्तेत सहभागी करुन घ्यावं, अशी सूचना त्यांनी केली.

 

निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाची ताकद दाखवण्याचं आवाहन माजी मंत्री महादेव जानकर यांनी केलं. त्याचवेळी ‘रिडालोस’चा अनुभव लक्षात ठेवण्याचा सल्ला त्यांनी उपस्थितांना दिला.