डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

July 2, 2024 3:20 PM

printer

महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीला प्रत्येकी दोन जागा

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या चार जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून यात दोन जागांवर महाविकास आघाडी तर दोन जागांवर महायुती विजयी झाली आहे. मुंबईतल्या दोन्ही म्हणजे मुंबई शिक्षक आणि मुंबई पदवीधर मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांनी विजय मिळवला. मुंबई पदवीधरमधून अनिल परब हे ४४ हजाराहून अधिक मतांनी विजयी झाले. तर शिक्षक मतदारसंघात शिक्षक भारतीचं सलग पंधरा वर्षांचं वर्चस्व मोडित काढत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज. मो. अभ्यंकर यांनी विजय मिळवला. कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपाच्या निरंजन डावखरे यांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला. त्यांना एक लाखापेक्षा जास्त मतं मिळाली. तर नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेनेचे किशोर दराडे हे विजयी झाले.