दिवाळीचा आनंद साजरा करताना विजेची रोषणाई तसंच फटाक्यांची आतषबाजी करताना सुरक्षिततेला प्राधान्य देणं आवश्यक असून सार्वजनिक वीज यंत्रणेबरोबरच घरगुती रोषणाईच्या उपकरणांपासून सावध राहावं असं आवाहन महावितरणने केलं आहे.
घरगुती विद्युत उपकरणांमधे दर्जेदार उत्पादनं वापरावीत, विजेवर चालणाऱ्या रोषणाईच्या उपकरणांपासून सुरक्षित अंतरावर तेलाच्या वातीचे दिवे लावावेत. वीज वाहिन्या, रोहित्र, फिडर पिलर आदी यंत्रणेपासून फटाके फोडताना सुरक्षित अंतर ठेवावं असं महावितरणने म्हटलं आहे. विद्युत यंत्रणेला आग लागल्यास, धोका निर्माण झाल्यास, वीजपुरवठा खंडित झाल्यास महावितरण कार्यालयाच्या १९१२ या टोल फ्री क्रमांकाशी तातडीने संपर्क साधावा, असं आवाहन महावितरणने केलं आहे.