महावितरणमध्ये विद्युत सहायक पदासाठी निवड झालेल्या ५ हजार ३८१ उमेदवारांची आणि संबंधित परिमंडळांची यादी कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे.
२० ते २२ ऑगस्ट दरम्यान मूळ कागदपत्रांची आणि प्रमाणपत्रांची पडताळणी संबंधित कार्यालयांमध्ये करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी महावितरणच्या संकेतस्थळाला भेट देण्याचं आवाहन कार्यालयातर्फे करण्यात आलं आहे.