महाविकास आघाडी येत्या रविवारी गेट वे ऑफ इंडिया इथं आंदोलन करणार

राजकोट किल्ल्यातला छत्रपती शिवाजी महारांजाचा पुतळा कोसळणं ही घटना संतापजनक आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी येत्या रविवारी मुंबईत गेट वे ऑफ इंडिया इथं आंदोलन करणार असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. महाविकास आघाडीतर्फे आज मालवणात मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर ते बातमीदारांशी बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते. जोरदार वाऱ्यामुळे पुतळा कोसळण्याची घटना कधीही घडली नसून स्मारकाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचं आरोप त्यांनी केला.