महाविकास आघाडीत मनसेला सामावून घ्यायला काँग्रेसनं विरोध केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात मुंबई महापालिकेची निवडणूक एकट्यानं लढवण्याची मागणी नेत्यांनी एकमतानं केली.
कुठल्याही जागेवर मैत्रीपूर्ण लढत करण्याचा काँग्रेसचा विचार नसल्याचं मुुंबई प्रदेशाध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी या बैठकीनंतर वार्ताहरांना सांगितलं. मनसेच्या युतीसंदर्भात पक्ष श्रेष्ठींना भूमिका कळवणार असल्याचं काँग्रेस नेत्यांनी सांगितलं.