डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

राज्यात क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांना अभिवादन

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आज पुण्यातल्या फुले वाड्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. उपमुख्यमंत्री आणि  पुणे जिल्ह्याचे पालक मंत्री अजित पवार यांनी फुले वाड्यातील महात्मा फुले यांच्या स्मारकाला अभिवादन केलं. 

 

धुळे जिल्हा न्यायालयाजवळील महात्मा फुले यांच्या पुतळ्याला विविध पक्ष, संघटनांच्या पदाधिकार्‍यांसह माळी महासंघ आणि समाजबांधवांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.  

 

वाशिम जिल्ह्यातही महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त मोटारसायकल सद्भावना रॅली काढण्यात आली. 

 

बुलडाणा जिल्ह्यातही आज आद्यक्रांतीकारक महात्मा जोतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी झाली. खामगाव शहरात फुले यांच्या जयंतीनिमित्तानं शहरातून मोटार सायकल रॅली, रुग्णांना फळवाटप करण्यात आलं. जळगाव, जामोद ,चिखली ,देऊळगावराजा इथं ही महात्मा फुले यांना अभिवादन करण्यात आलं.

 

अहिल्यानगर जिल्ह्यात महात्मा फुले यांची जयंती विविध शाळा महाविद्यालयात  मोठ्या उत्साहात साजरी झाली. राहुरी इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या डॉ. नानासाहेब पवार सभागृहात विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा