डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून अभिवादन

थोर समाजसुधारक, क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून अभिवादन करण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महात्मा फुले यांना आदरांजली वाहिली. महात्मा फुले हे मानवतेचे खरे सेवक होते, त्यांनी समाजातल्या शोषित आणि वंचित घटकांच्या कल्याणासाठी आपलं जीवन समर्पित केलं. देशासाठी त्यांचं अमूल्य योगदान प्रत्येक पिढीला प्रेरणा देत राहील, असं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतल्या निवासस्थानी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं. उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी समाजमाध्यमावर संदेशातून महात्मा फुले यांना अभिवादन केलं.  देशातली प्रगत, पुरोगामी, सुधारणावादी समाजव्यवस्था ही क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा आणि क्रांतिज्योती सावित्रीबाईंची दूरदृष्टी, त्याग आणि परिश्रमांचे फळ आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फुले यांना आदरांजली वाहिली. फुले यांच्या जयंतीचं औचित्य साधत पवार यांनी पुण्यातल्या गंज पेठ इथल्या  महात्मा फुले वाड्याला भेट दिली. तिथं  फुले यांच्या  पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.

 

यावेळी फुले यांच्याशी संबधित छायाचित्रे आणि वस्तूंचा संग्रह असलेल्या संग्रहालयाची पाहणी केली. महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग आणि महात्मा जोतीराव फुले चरित्र साधने प्रकाशन समितीनं प्रकाशित केलेल्या  महात्मा फुले समग्र वाड्मय  या पुनर्मुद्रित ग्रंथाचं उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते  प्रकाशन आणि वितरण झालं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.