देशोदेशीच्या भारतीय दूतावासांमधे आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम होत आहेत. न्यूझीलंड,साओपावलो, जपान,तसंच नेपाळ मधल्या दूतावासांमधे गांधीजींच्या शिकवणीवर आधारित व्याख्यानं, स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार स्वच्छतेचं महत्त्व पटवून देणारे उपक्रम असे कार्यक्रम झाले. ऑस्ट्रेलियात सिडनी मधे ज्युबिली पार्क इथल्या गांधीजींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. भारतीय वंशाचे ऑस्ट्रेलियन खासदार समीर पांडे देखील यावेळी उपस्थित होते. पापुआ न्यू गिनी विद्यापीठातही महात्मा गांधी यांना आदरांजली वाहण्यात आली.
Site Admin | October 2, 2025 1:34 PM | Mahatma Gandhi Jayanthi
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम