राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना देशभरात अभिवादन

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५६व्या जयंतीनिमित्त देश त्यांना अभिवादन करीत आहे. देशभरात आणि परदेशातल्या भारतीय दूतावासांमधे त्यानिमित्त विविध कार्यक्रम होत आहेत. नवी दिल्लीत राजघाट इथं महात्मा गांधींच्या समाधीस्थळी सर्वधर्म प्रार्थनेचं आयोजन करण्यात आलं होतं.

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभेचे सभापती ओम बिरला  यांनी  राजघाट इथं पुष्पांजली अर्पण केली. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी दिलेले शांति, सहिष्णुता आणि सत्य यांचे आदर्श साऱ्या मानवतेला प्रेरणादायी असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आदरांजली संदेशात म्हटलं आहे.  

 

तसंच लोकसभेतले विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनीही राष्ट्रपिता महात्मा गांधींना आदरांजली वाहिली आहे. याखेरीज अनेक राजकीय नेते आणि विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी गांधीजयंतीनिमित्त अभिवादन केलं आहे. गांधी जयंती निमित्त देशभरात स्वच्छता मोहीमेसह प्रभातफेऱ्या, प्रदर्शनं व्याख्यानं असे कार्यक्रम होत आहेत.

 

महाराष्ट्रात राजभवन इथं राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि देशाचे दुसरे प्रधानमंत्री लाल बहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.