राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाशिवरात्री निमित्त देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.
भगवान महादेवाचे आशीर्वाद सर्व नागरिकांवर राहावेत आणि देश प्रगतीच्या मार्गावर पुढे जात रहावा अशी कामना राष्ट्रपतींनी समाज माध्यमावर आपल्या संदेशात व्यक्त केली आहे.
महाशिवरात्रीचा सण आत्मनिरीक्षण आणि आध्यात्मिक चेतनेचं प्रतीक असून लोकांना ज्ञान, संयम आणि करुणेच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देत असल्याचं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
भगवान शंकराचा हा सण सर्व देशवासीयांना समृद्धी आणि चांगले आरोग्य देईल अशी शुभेच्छा प्रधानमंत्र्यांनी दिल्या आहेत.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी देखील महाशिवरात्रीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.