January 15, 2026 8:16 PM

printer

१२ जिल्हा परिषदा आणि सव्वाशे पंचायत समित्यांच्या निवडणुकीची रणधुमाळी उद्यापासून सुरू होणार

राज्यातल्या १२ जिल्हा परिषदा आणि सव्वाशे पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी उद्यापासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे. २१ जानेवारीपर्यंत ऑफलाईन पद्धतीने यासाठी अर्ज भरता येतील. या टप्प्यात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या १२ जिल्हा परिषदांच्या आणि त्या जिल्ह्यातल्या पंचायत समित्यांसाठी निवडणुका होणार आहेत.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.