विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या तारखा जाहीर, रविवारीही कामकाज सुरू

महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला ८ डिसेंबरपासून नागपूर इथं सुरूवात होणार आहे. मुंबईत विधानभवन इथं आज विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली, यात हा निर्णय झाला. हे अधिवेशन १४ डिसेंबरपर्यंत चालेल. १३ डिसेंबर, शनिवारी आणि १४ डिसेंबर, रविवारी शासकीय सुट्टीच्या दिवशीही सभागृहाचं कामकाज होणार आहे. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानपरिषद सभापती राम शिंदे उपस्थित होते.