डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

मविआचा महाराष्ट्रनामा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत जाहीर

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज मुंबईत महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीसाठीचा महाविकास आघाडीचा महाराष्ट्रनामा प्रकाशित केला. मुंबईत जाहीर केलेल्या पंचसूत्री कार्यक्रमावर आधारित हा सविस्तर जाहीरनामा प्रकाशित करत असल्याचं मल्लिकार्जुन खर्गे यावेळी म्हणाले. या महाराष्ट्रनाम्यात शेती आणि ग्रामीण विकास, उद्योग आणि रोजगार, पर्यावरणावर आधारित शहर विकास या मुद्द्यांवर आश्वासनं देण्यात आली आहेत. पंचसूत्री कार्यक्रमात प्रत्येक कुटुंबाला वर्षाकाठी ३ लाख रुपयांची मदत, महालक्ष्मी योजनेअंतर्गत पात्र महिलांना प्रतिमहिना ३ हजार रुपये, महिलांना मोफत बस सेवा, तीन लाखापर्यंत कृषीकर्ज माफी, बेरोजगारांना नोकरी शोधण्यासाठी दरमहा ४ हजार रुपये भत्ता, २५ लाखांचा आरोग्य विमा अशी आश्वासनं आहेत. 

महाराष्ट्रासह देश आणि, जगासाठी मुंबई हे एक अर्थ, रोजगार, निर्मिती, गुंतवणूक अशा सर्व घटकांच्या दृष्टीने महत्त्वाचं शहर आहे. मुंबईसह महाराष्ट्र हा सामाजिकदृष्ट्याही प्रगत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातली निवडणूक ही देशासाठी महत्त्वाची निवडणूक आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आल्यास इथे एक चांगलं प्रशासन येऊ शकेल. हा जाहीरनामा महाराष्ट्राचा अभ्यास करूनच प्रकाशित करत आहोत, असं खर्गे म्हणाले. 

यावेळी खासदार सुप्रिया सुळे, खासदार संजय राऊत हेही उपस्थित होते.