राज्यातल्या नागरिकांना दिलेली आश्वासनं पूर्ण करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

राज्यातल्या, शेतकरी, युवा वर्ग, ज्येष्ठ नागरिक, वंचित घटकांना दिलेली आश्वासनं पूर्ण केली जातील. शासनाच्या सुरु असलेल्या योजना बंद होऊ देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज विधानसभेत दिली. राज्यपालांच्या अभिभाषणावरच्या चर्चेला ते उत्तर देत होते.

राज्यात १६ हजार मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचे प्रकल्प सुरू केले आहेत. आतापर्यंत ६६७ मेगावॅट वीज कार्यान्वित झाली. २०२६ पर्यंत १६ हजार मेगावॅट वीज कार्यान्वित करण्याचा प्रयत्न करणार आहे. शेतकऱ्यांकडून विजेचे बिल घेणार नाही, असं ते म्हणाले. ९ लाख कृषीपंप आज आपल्याकडे उपलब्ध आहेत. मागेल त्याला सौरपंप आम्ही देणार असून ३ महिन्यात जोडणी देऊ, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असून, १ जुलै २०२२ पासून सुमारे साडेतीन लाख कोटी रपयांची गुंतवणूक राज्यात आली आहे. यामुळे २लाख १३ हजार २६७ इतकी रोजगार निर्मिती होणार आहे. राज्यात वसुलीबाजांना थारा दिला नाही तर राज्याच्या प्रगतीचा वेग दुप्पट होईल. अशा वसुलीबाजांवर आता कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचंही फडनवीस यांनी सांगितलं.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.