डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

राज्यात अवकाळी पाऊस

राज्यात आज विविध ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली. बीड शहरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. पावसामुळे, पाेलिसांसाठी नव्यानं बांधलेल्या इमातीतल्या घरांच्या खिडक्या निखळल्या. जालना शहरासह जिल्ह्यातही हलक्या स्वरुपाचा पाऊस पडला. कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातही आज दुपारच्या सुमाराला अवकाळी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या.  

 

नाशिक शहराला सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसानं झोडपून काढलं. त्यामुळे अनेक भागात पाणी साचलं तर मोठ्या प्रमाणात वृक्ष उन्मळून पडल्यानं वीज पुरवठाही काही काळ खंडीत झाला. अवकाळी पावसामुळे झाड अंगावर पडल्यानं नाशिकमध्ये आज एका दुचाकीस्वाराचा  मृत्यू झाला तर काल एका युवतीचा वीज अंगावर पडून मृत्यू झाला.  कृषी विभागानं दिलेल्या माहितीनुसार नाशिक जिल्ह्यातल्या ६०० गावांमधल्या १४ हजार ६१३ शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. 

 

नंदुरबार जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगांसह अनेक ठिकाणी आज दमदार पावसानं हजेरी लावली. सोलापूर जिल्ह्यात पडलेल्या पावसानं तापमानात मोठी घट झाली आहे.  

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.