राज्यात अवकाळी पावसाची हजेरी

राज्याच्या अनेक भागात आज अवकाळी पाऊस झाला.

 

रत्नागिरीत आज पहाटे अनेक ठिकाणी वीजांसह जोरदार पाऊस पडला. पावसामुळे आंबा-काजूसारख्या पिकांसाठी तो नुकसान झालं आहे.

 

भंडारा जिल्ह्यात आज सकाळपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होत आहे. तुमसर तालुक्यातल्या पाथरी इथं वीज पडून दोन मजुरांचा मृत्यू झाला.

 

नागपूर जिल्ह्यात आज सकाळपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली आहे.

 

अहिल्या नगर जिल्ह्यात बहुतांश भागात जोरदार पाऊस झाला. अवकाळी पावसाने कांदा आणि फळबागांचे नुकसान झाले.

 

लातूर शहर आणि परिसरात संध्याकाळी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे लातूरमध्ये अनेक भागातला विद्युत पुरवठा खंडीत झाला होता.

 

साताऱ्याच्या काही भागात आज दुपारी मेघगर्जनेसह अवकाळी पावसानं हजेरी लावली.

 

बीड जिल्ह्यात केज तालुक्यात केकाणवाडी इथं झाडावर वीज कोसळल्यामुळे शेतकरी आणि गायीचा मृत्यू झाला.