सातारा जिल्ह्यातल्या कराड तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट सुरू असून उर्वरित भागात सोसाट्याचा वारा सुरू आहे.
जालना जिल्ह्यात आज काही ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली. घनसावंगी तालुक्यातल्या अनेक गावांमधे जोरदार पाऊस झाला. यामुळे मका, गहू आणि हरभऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे.
पालघर जिल्ह्यात कालपासून ढगाळ वातावरण होतं. जिल्ह्यातल्या काही भागात हलका पाऊस पडला.