April 1, 2025 8:47 PM | Weather Update

printer

राज्यात अवकाळी पावसाचा इशारा

राज्यातल्या बहुतेक भागांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा हवामानखात्यानं दिला आहे. जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे जिल्ह्यात घाटमाथा परिसर, छत्रपती संभाजीनगर, जालना, सातारा या जिल्ह्यांना हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

 

येत्या दोन दिवसांसाठी ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी तसंच अकोला, अमरावती , बुलढाणा, कोल्हापूर, सांगली, बीड, लातूर, भंडारा, धाराशिव, नांदेड या जिल्ह्यांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांमधे अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.