सर्व विद्यापीठांनी दर ३ महिन्यांनी कार्यअहवाल सादर करण्याचे राज्यपालांचे निर्देश

राज्यातल्या सर्व विद्यापीठांनी दर तीन महिन्यांनी राजभवनाला कार्यअहवाल सादर करावा असं राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सांगितलं आहे. राज्यातल्या अकृषी  विद्यापीठांच्या कुलगुरुंशी आज कुलपती या नात्याने दूरदृष्यप्रणालीमार्फत ते बोलत होते. या अहवालात आपल्या अडीअडचणी मांडाव्या असं त्यांनी सांगितलं.  नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करावी तसंच राष्ट्रीय गुणांकन सुधारावं अशी सूचना राज्यपालांनी केली.