राज्यातल्या पर्यटन स्थळांचा प्रचार करण्यासाठी ‘तुमच्या नजरेतून महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे’ हा उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमाअंतर्गत सर्वोत्तम छायाचित्राला ५ लाख रुपयांचं प्रथम पारितोषक देण्यात येणार असल्याचं पर्यटन मंत्री शंभुराज देसाई यांनी सांगितलं. मुंबईत सह्याद्री अतिथीगृह इथं महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची १७५वी संचालक मंडळाची बैठक आज झाली, त्यावेळी ते बोलत होते. या उपक्रमात जास्तीत जास्त पर्यटकांनी सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं.
Site Admin | September 15, 2025 7:05 PM | Maharashtra Tourism
‘तुमच्या नजरेतून महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे’ उपक्रमात प्रथम विजेत्याला लाखोंचं बक्षीस
