Maharashtra : ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात

राज्यातला ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात असून, बहुतांश कारखान्यांनी ऊस गाळप बंद केलं आहे. यंदाच्या गाळप हंगामासाठी ३१ मार्चअखेर साखरेचं उत्पादन ८० लाख २६ हजार टनपर्यंत पोहोचलं आहे, मागील हंगामाच्या तुलनेत या वर्षी साखरेचं उत्पादन सुमारे ३० लाख मेट्रिक टन कमी आहे. साखर आयुक्तालयाच्या अहवालानुसार  राज्यातल्या एकूण १९२ साखर कारखान्यांनी ऊस गाळप समाप्त केलं असून, यामध्ये पुण्यातील २८कारखान्यांचा समावेश आहे.