महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार येत्या मंगळवारी ५ ऑगस्ट रोजी मुंबईत प्रदान करण्यात येणार आहेत. गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार गझलगायक भीमराव पांचाळे यांना प्रदान करण्यात येणार आहे. तसंच, चित्रपती व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार अभिनेता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना प्रदान करण्यात येईल.
चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना देण्यात येणार आहे. राज कपूर जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांना तर राजकपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री काजोल यांना दिला जाणार आहे. यंदापासून छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्कार देण्याची घोषणा शासनानं केली असून सांस्कृतिक वारसा आणि इतिहास जपणाऱ्या कार्यकर्त्यांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येईल.