‘मागेल त्याला कृषीपंप’ योजनेत महाराष्ट्राचा विश्वविक्रम

‘मागेल त्याला सौर कृषीपंप’ या योजनेत राज्यानं केलेल्या विश्वविक्रमाचं प्रमाणपत्र देण्याचा कार्यक्रम आज छत्रपती संभाजीनगर इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला. गिनीज बुकच्या प्रतिनिधींनी हे प्रमाणपत्र देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केलं. महावितरणने एकाच महिन्यात ४५ हजार ९११ सौरकृषीपंप स्थापन करण्याचा उच्चांक केला आहे. या विश्वविक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.