राज्यातल्या अंगणवाड्यांचं आधुुनिकीकरण करण्यासाठी स्मार्ट अंगणवाडी कीट खरेदीला सरकारने मंजुरी दिली आहे. या योजने अंतर्गत परभणी जिल्ह्यातल्या सुमारे २६५ अंगणवाडी केंद्रांंच रुपांतर अत्याधुनिक सुविधांनी युक्त स्मार्ट अंगणवाडीमधे केलं जाणार असल्याचं महिला आणि बालविकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सांगितलं. स्मार्ट अंगणवाडी योजनेमुळे परभणी जिल्हयातल्या बालकांना आनंददायी शिक्षणाचं वातावरण उपलब्ध होईल. मुलांच्या सर्वांगीण विकासासोबतच महिलांच्या सक्षमीकरणासाठी ही योजना महत्वपूर्ण ठरणार आहे, असं बोर्डीकर म्हणाल्या.
Site Admin | November 3, 2025 7:19 PM | meghna bordikar | Parbhani | Smart Anganwadi
राज्यातल्या स्मार्ट अंगणवाडी कीट खरेदीला मंजुरी